‘एमपीएससी’चे वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्याची मागणी


वृत्तसंस्था

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे संयुक्त पूर्व परीक्षेवर परिणाम झाला आहे. अभ्यास करूनही परीक्षा घेतल्या जात नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. MPSC schedule should be announced , Students demand To Government

स्वप्नील लोणकरने परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती झाली नाही म्हणून आत्महत्या केली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यानी सरकारच्या धोरणाबाबत संताप व्यक्त केला. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेबाबत होणाऱ्या दिरंगाई बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून किमान वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे.
या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, या आशेवर लाखो विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्याचा मानसिक ताण त्यांच्यावर आला आहे.दरम्यान, काही विद्यार्थ्यानी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतलेली नाही. यामुळे किमान सप्टेबरमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी व इतर आणि रखडलेल्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वयक समितीमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.सर्व व्यवसाय, उद्योगधंदे सुरळीत सुरु असताना केवळ स्पर्धा परीक्षाचे क्षेत्र बंद आहे. यामुळे विद्यार्थ्याचा संयम सुटत चालला आहे.

संयुक्त पूर्व परीक्षेबाबत…

  • दीड वर्षापासून वेळापत्रक जाहीर नाही
  • परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी
  • कोरोनामुळे अद्यापही परीक्षा झाली नाही.
  • आयोगाने किमान अंदाजे वेळापत्रक जाहीर करावे
  • तरच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
  • आणखी किती दिवस परीक्षेची वाट पाहणार

MPSC schedule should be announced , Students demand To Government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी