Maharashtra Assembly Monsoon session 2021 : 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Assembly Monsoon session 2021 live updates Ajit pawar Annouces MPSC Joining Till 31st July 2021

Maharashtra Assembly Monsoon session 2021 : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्वांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी नियुक्त्या या व इतर मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खडाजंगी उडत आहे. Maharashtra Assembly Monsoon session 2021 live updates Ajit pawar Annouces MPSC Joining Till 31st July 2021


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्वांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी नियुक्त्या या व इतर मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खडाजंगी उडत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी वाचली स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची सुसाइड नोट सभागृहात वाचून दाखवली. ते म्हणाले की, एमपीएससीचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घ्यावा. एमपीएससी मायाजाल असं लिहून त्याने जीवन संपवलं आहे. नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. अजून किती स्वप्निल होतील? सरकार याबाबत काही कारवाई करणार की नाही? सगळं कामकाम बाजूला ठेवून MPSCवर चर्चा करा म्हणत फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. ते पुढे म्हणाले की, MPSCबाबत सरकार गंभीर नाही, राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, आयोग काय करतंय? विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. एमपीएससी मुद्द्यांवर भाजपचा स्थगन प्रस्तावही आला.

अजित पवारांची एमपीएससी नियुक्त्यांची घोषणा

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार आहे. एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकरचा मुद्दा विरोधकांनी उचलला, परंतु ही घटना वेदनादायी आहे. काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून या विषयासंर्भात काय करू शकतो यावर चर्चा केली. सरकारने एमपीएससीचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले की, स्वप्निलची आत्महत्या ही वेदनादायी आहे. पुन्हा ही वेळ राज्यातील कुठल्याही तरुणावर येऊ नये, असा सरकारचा प्रयत्न असेल.

Maharashtra Assembly Monsoon session 2021 live updates Ajit pawar Annouces MPSC Joining Till 31st July 2021

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय