अमेरिकेत पर्यटकांना अंतराळात ९० किलोमीटर उंचीवरून पृथ्वी पाहण्याची संधी


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ या कंपनीला अवकाश कक्षेपर्यंत विमान उड्डाण करण्यास अमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे ते जमिनीपासून ९० किलोमीटर उंचीपर्यंत पर्यंटकांना घेऊन जाऊ शकणार आहेत.Torist can see earth from space also

ब्रॅन्सन यांच्या कंपनीला त्यांच्या विमानाची चाचणी घेण्यास आधीच परवानगी मिळाली होती. या चाचण्या समाधानकारकरित्या पार पडल्याने आता पर्यटकांनाही घेऊन जाण्याची त्यांना मुभा मिळाली आहे. अवकाशकक्षेपर्यंत जाऊन वजनविरहित स्थिती अनुभवण्याचा आणि पृथ्वीला दुरुन पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी सुमारे ६०० जणांनी ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’कडे नोंदणीही केली आहे.



त्यांनी त्यासाठी आगाऊ रक्कमही भरली आहे. या ‘अवकाशवीरां’मध्ये अतिश्रीमंत उद्योगपती आणि सिनेजगतातील कलाकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात उभारलेल्या विशेष तळावरून विमानाचे उड्डाण होणार आहे. पहिल्या फेरीत खुद्द रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

ॲमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस हे देखील त्यांच्या कंपनीद्वारे निर्मित यानातून २० जुलैला अवकाशात उड्डाण करणार आहेत. त्यापूर्वीच, ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’च्या विमानाचे उड्डाण करण्याचा ब्रॅन्सन यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कंपनीने मात्र उड्डाणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

Torist can see earth from space also

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात