Maharashtra Assembly Monsoon session 2021 : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, हे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता, वाचा अध्यादेशांची यादी

Maharashtra Assembly Monsoon session 2021 List Of Proposed Bills and issues Update

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2021 (Maharashtra Assembly Monsoon session 2021) आजपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांवर आणण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस पार पडणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी ते विविध कारणांनी वादळी ठरण्याची शक्यता जास्त आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या अधिवेशनात अनेक विधेयके व अध्यादेश पारित होण्याची शक्यता आहे. तरीही प्रामुख्याने तीन प्रस्तावांकडे सर्वांच्या नजरा आहेत. Maharashtra Assembly Monsoon session 2021 List Of Proposed Bills and issues Update


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2021 (Maharashtra Assembly Monsoon session 2021) आजपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांवर आणण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस पार पडणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी ते विविध कारणांनी वादळी ठरण्याची शक्यता जास्त आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या अधिवेशनात अनेक विधेयके व अध्यादेश पारित होण्याची शक्यता आहे. तरीही प्रामुख्याने तीन प्रस्तावांकडे सर्वांच्या नजरा आहेत.

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव

केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांना देशभरातून तीव्र विरोध होत आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवरही या कायद्यांना प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार या कायद्याविरोधात प्रस्ताव सादर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी प्रस्ताव

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. यानंतर आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या अखत्यारीत गेला आहे. यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करून पावले उचलावीत याकरिता महाविकासआघाडी सरकार यावरही प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रस्ताव

राज्यात मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत तरी राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका होऊ नयेत, असा पवित्रा सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतलाय. ओबीसी आरक्षणासाठीचा इम्पेरिकल डेटा केंद्राने राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी सत्ताधारी करत आहेत. यासाठी अधिवेशनात एक प्रस्तावही येण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन–२०२१ : प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी

१. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठीमहाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

२. इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व रोख वसूल केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे. म्हणून, शासनास, अशा इनाम किंवा वतन जमिनीवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, अनर्जित उत्पन्नाची एकूण रक्कम आणि द्रव्यदंडाची रक्कम वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा इनाम किंवा वतन जमिनीच्या मूल्याच्या पंचवीस टक्के इतकी कमी करण्यासाठी तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) यासाठी (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (महसूल व वने विभाग)

३. महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत दिनांक 19.12.2020 रोजी संपुष्टात आल्याने आणि परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रशासकाला पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, 1966 याच्या कलम 40 च्या पोट-कलम (3) मध्ये परंतुक जादा दाखल करणे. तसेच प्रशासकाने दि. 19.12.2020 पासून परिषदेच्या कामकाजाबाबत घेतलेले निर्णय, घटना व कृती यांना कायदेशीर संरक्षण देणेकरीता तरतूद करण्यासाठीमहाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) विधेयक, 2021 (वैद्यकीय शिक्षण विभाग)

४. राज्यातील हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठीमहाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)

५. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2021 (वित्त विभाग).

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतुदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलामांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 हिवाळी अधिवेशन 2020 मध्ये आणण्यात आला. (गृह विभाग)

विधानसभेत प्रलंबित विधेयक

शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक, 2020 आणण्यात आले. याअंतर्गत महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधारण न्यायालये निर्माण करून 30 कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. (गृह विभाग).

Maharashtra Assembly Monsoon session 2021 List Of Proposed Bills and issues Update

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात