दोन राजांच्या तोंडी भाषा ऐक्याची; राजकीय बाणांची दिशा मात्र वेगवेगळी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चेसाठी पुण्यात दोन राजांची भेट झाली. त्यांच्या तोंडी भाषा तर ऐक्याची होती. पण प्रत्यक्षात ते सोडत असलेल्या राजकीय बाणांची दिशा मात्र वेगवेगळी आहे. MP Sambhaji raje indirectly targets Modi govt; MP Udayan raje targets thackeray – pawar govt over maratha reservation

कोल्हापूरात काल केलेल्या मराठा आरक्षण मूक आंदोलनातली भाषणे ऐकली तर त्यांचा सगळा रोख आता केंद्रातील मोदी सरकारवर असल्याचे स्पष्ट दिसून आले. शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाच्या भाषणात त्याचा स्पष्ट उल्लेख देखील होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बहुमत आहे. आपल्याला त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्यांना पटवून देऊन दिल्लीत लॉबिंग केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातले ठाकरे – पवार आपल्या बाजूने असल्याची खात्री देत आपला स्वतःचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे सूचित केले आहे.

कालच्या आंदोलनातून खासदार संभाजीराजे यांचे कोल्हापूरात “राजकीय मजबूतीकरण” देखील करून घेण्यात आले. त्यावर एक प्रकारे सर्वपक्षीय मोहोर उमटविण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा पाहिली तर ते महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला जबाबदारीची स्पष्ट शब्दांमध्ये जाणीव करून देत असल्याचे दिसते.



उद्धवजी, मराठा समाजाच्या आरक्षणाची बाब गंभीर असूनही आपले सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यावर तोडगा काढण्याचे अनेकदा आश्वासन देऊनही ठोस पावले उचलताना दिसत नाही. आतापर्यंत मराठा समाजाने खूप संयमाची भूमिका घेतली आहे म्हणून सरकारने त्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये, तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून मराठा समाजाला न्याय द्याल अशी मला आशा आहे,” असे उदनयराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्य सरकारने आता विलंब न करता येत्या ५ जुलै २०१९ च्या आधी सर्व मागण्या मंजूर केल्याची घोषणा तात्काळ करावी. अन्यथा मराठा समाजातून जो उद्रेक होईल त्याला सर्व लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार जबाबदार असेल. त्यामुळे सरकारने वरील मागण्या तातडीने मंजूर कराव्यात ही विनंती, असा इशाराही त्यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.

कोल्हापूरात संभाजीराजे यांनी केलेल्या मराठा आरक्षण मूक आंदोलनात ठाकरे – पवार सरकारच्या बाजूने कल दिसला आहे आणि उदयराजे भोसले यांनी पत्रातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे, हा दोन राजांच्या भूमिकांमधला महत्त्वाचा फरक आहे. आणि त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.

MP Sambhaji raje indirectly targets Modi govt; MP Udayan raje targets thackeray – pawar govt over maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात