इचलकरंजीतील हृदय हेलावून टाकणारी घटना अभ्यास न करण्याच्या किरकोळ कारणावरून केली आत्महत्या

विशेष प्रतिनिधी

इचलकरंजी: कोरोना संसर्गामुळे देशातील सर्व शाळा व महाविद्यालय गेली दोन वर्षे बंद होती. आता शाळा सुरू झाल्या आहेत. गेली दोन वर्षे शाळा बंद असल्याने मुलांच्या अभ्यासावर याचा खूप मोठा परिणाम झाला. अशातच कोल्हापुरातील इचलकरंजी येथे एक दुःखद घटना घडली आहे.

Minor female student in ichalkarnji committed suicide

इचलकरंजी येथील चांदणी चौक परिसरात एका अल्पवयीन मुलीनं किरकोळ कारणावरून गळफास लावून घेतला. या मुलीचे वय अवघे १६ वर्षांचे आहे. तिचे नाव प्राजक्ता दीपक कोकरे असे आहे. या मुलीला तिच्या आईने अभ्यास करण्यासाठी सांगितले. पण अभ्यासाचा कंटाळा आल्याने तिने नकार दिला व या कारणातून दोघींच्यात किरकोळ वाद झाला. त्यामुळे मुलीने रागारागात घरातील वरच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.


कोल्हापूर अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा फोन करणारे आरोपी अटकेत


प्राजक्ताने घरामधील वरच्या खोलीत जाऊन लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. प्राजक्ता व तिच्या आई मध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. काल दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली. मुलीचे वडील दीपक कोकरे यांनी या घटनेबाबत नोंद केल्यानंतर पोलिसांकडून त्याचा पुढील तपास पोलिस सुरू आहे.

 

Minor female student in ichalkarnji committed suicide

 

महत्त्वाच्या बातम्या