गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले – राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये ; अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे


महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai said – People of the state should not be scared; People with such heady tendencies should be ignored


विशेष प्रतिनिधी

सातारा : मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांना भडकवून हिंसाचार घडविण्यात आला.यादरम्यान राज्यातील काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनेला जबाबदार असणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले असून, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे दिला.

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला आहे ,त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पण या वेळी राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये. अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे.तसेच महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.

Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai said – People of the state should not be scared; People with such heady tendencies should be ignored

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात