मेंदूचा शोध व बोध : आपला मेंदू असतो सतत आव्हानांच्या शोधात


एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ती पटकन शिकतात, पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतोच, तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकलेलं विसरून जाण्याची शक्यताही जास्त असते. मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन, ठरवून मेहनत केली तर प्रौढ ते शिकून घेऊ शकतो. कारण पेशीनिर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालनाही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदूही आव्हानांच्या शोधात असतो. मेंदूला आव्हानात्मक काम देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो. Your brain is constantly on the lookout for challenges

मुलं निसर्गत:च वेगवेगळी आव्हानं शोधत असतात. कारण त्यांना सतत शिकत राहायला आवडतं. मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सततच असतात. जर मेंदूशास्त्रीय दृष्टय़ा ही गोष्ट सिद्ध झालेली असेल तर आपली मुलं बऱ्याचदा कंटाळलेली का असतात? अभ्यास करायला कायमच नकार का असतो? याचं कारण आपल्या अभ्यासपद्धतीत सापडतं. पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवणं, प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहिणं, पाठ करून लिहिणं, वही उतरवून काढणं, पुन्हा पुन्हा परीक्षा देणं यात शून्य आव्हान आहे. अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळतं. पण त्याचं पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी पेशीनिर्मिती होत नाही. अभ्यास पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होतं. पण पुढे त्यांचा चांगलाच कंटाळा येतो. म्हणून मुलं कंटाळतात.

अभ्यास हा आव्हानांशी- वेगवेगळ्या उपक्रमांशी जोडला गेला तरच त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल. मग हे उपक्रम अवघड असतील तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल. उत्क्रांतीच्या काळात माणसाचा मेंदू अधिकाधिक तत्पर- चलाख होत गेला. त्याला तसंच ठेवायचं असेल तर जाणीवपूर्वक दिनचय्रेत बदल करावा लागेल.

Your brain is constantly on the lookout for challenges

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण