मुंबईत होणार म्हाडाचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह , ५०० जणांची व्यवस्था


विशेष प्रतिनिधी

मुंबई – शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यासाठी म्हाडामार्फत विद्यार्थ्यांचे पहिले वसतिगृह काळाचौकी येथे उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात ५०० मुला-मुलींची व्यवथा होणार आहे.MHADA will build new hostel for students

या वसतिगृहाचा आराखडा मुंबई मंडळाने तयार केला असून तो मंजुरीसाठी गृहनिर्माण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी मुंबईत येतात. परंतु आर्थिक राजधानीत घर घेऊन राहणे अनेकांना परवडणारे नसते.त्यामुळे अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. वास्तव्याअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी सरकारने मुंबईत चार ठिकाणी वसतिगृह बांधण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे म्हाडाच्या मुंबई मंडळाने काळाचौकी येथे वसतिगृह उभारणायची तयारी सुरू केली आहे.

शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध नाही. आर्थिक परिस्थिती ठीक असलेले विद्यार्थी भाड्याने घर घेऊन शिक्षण पूर्ण करतात. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असलेले विद्यार्थी रेल्वे स्थानक किंवा बस डेपोमध्ये राहून शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी गृहनिर्माण विभागाने वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

MHADA will build new hostel for students

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था