MARATHWADA CLOUDBURST : ढगांचा ढोल विजांचा थयथयाट-औरंगाबादेत आभाळ फाटलं ! २५ मिनिटात ५१.२ मिमी पाऊस


  • शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पंचवीस मिनीटात 51. 2 मिमी पावसाची नोंद झाली.

  • पहाटे 05.35 पर्यंतच्या दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली. 

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबादेत पहाटे ३.३० वाजल्यापासून निसर्गाने रौद्ररूप धारण केले होते. ढगांच्या गडगडाटाने आणि विजांच्या थयथयाटाने अख्ख औरंगाबाद हादरून गेलं होत.पहाटे ३.३५ वाजल्यापासून सुरू असलेल्या पाऊस ४.०० वाजेपर्यंत तुफान बरसत होता. या पंचवीस मिनिटात सरासरी ११८ मिली प्रति तास या वेगाने पावसाच्या सरी कोसळत होत्या.२५ मिनीटात ५१.२ मिमी पावसाची नोंद झाली. MARATHWADA CLOUDBURST : 51.2 mm of rain in 25 minutes

पुढील चार दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी पहाटेच शहरावर वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

कडाडणाऱ्या वीजांच्या आवाजाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची मात्र झोप उडाली. कारण मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाने शहरातील अनेक वसत्यांमध्ये पाणी शिरत आहे. औरंगाबाद परिसरातील ग्रामीण भागालाही या पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे आधीच ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या पिकांचं आणखी नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा  खंडित झाला आहे.

शहरात किती पाऊस झाला?

शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात ५१. २ मिमी पावसाची नोंद झाली. साडे चार वाजेनंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे ५.३० पर्यंतच्या दोन तासात शहरावर ७८.२ मिमी पावसाची नोंद झाली.

MARATHWADA CLOUDBURST : 51.2 mm of rain in 25 minutes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”