मुंबईतही चार ऑक्टोबरपासून महापालिकांचा शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा अखेर ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश महापालिकने दिले आहेत.Schools will open in Mumbai from oct.

मुंबईत आठवी ते बारावीपर्यंतचे सर्व बोर्डाच्या एकूण दोन हजार ५५३ शाळा असून त्यात पाच लाख १३ हजार ५०२ विद्यार्थी आहेत. पालिकेच्या सुमारे ८७१ हून अधिक शाळा असून त्यात ६७ हजार ३६१, एक हजार ७७२ खासगी शाळांमध्य चार लाख ४६ हजार १४१ विद्यार्थी आहेत.राज्य सरकारने येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश महापालिकेने शाळांना दिले आहे.

दरम्यान, आरोग्यविषयक खबरदारी म्हणून प्रत्येक शाळेने पालिका आरोग्य केंद्र किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न करून घेण्यात यावे, असेही पालिकेने त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Schools will open in Mumbai from oct.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात