मराठीत भाषण करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी जिंकली मने, येत्या पाच वर्षांत चिपी विमानतळावरून 20 ते 25 उड्डाणे सुरू होण्याची केली अपेक्षा


प्रतिनिधी

कणकवली : चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मराठीतून भाषण करून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मने जिंकली. येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सिंधुदुर्ग विमानातळावरून, 20 ते 25 विमानांची वाहतूक सुरु व्हावी, अशी आपली इच्छा आहे, असे ते यावेळी म्हणाले.Marathi, Jyotiraditya Shinde won hearts and minds, expecting to start 20 to 25 flights from Chippewa Airport in the next five years.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग- मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.



हायब्रीड म्हणजेच, आभासी आणि प्रत्यक्ष अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्योतिरादित्य स यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले.

महाराष्ट्रातील विमानतळाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रासोबत आपले केवळ राजकीय संबंध नसून या राज्यासोबत आपले एक कौटुंबिक नाते असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करत महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असल्याचं सांगत शिंदे म्हणाले आपल्या आयुष्यातला हा एक भावूक क्षण असल्याचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनामुळे, गेल्या तीन दशकांचे स्वप्न पूर्ण झाले असून एक नवा अध्याय यामुळे रचला गेला.

कोकण आणि सिंधुदुर्ग प्रदेशाला लाभलेला गौरवशाली इतिहास आणि या भागाचे सौंदर्य आज या विमानतळ उद्घाटनाच्या माध्यमातून हवाई वाहतुकीच्या नकाशावर आले आहे, या प्रदेशाचे हे वैशिष्ट्य आता देशात प्रसिद्ध करण्याचा आपला संकल्प असल्याचं शिंदे म्हणाले. आजच्या या उद्घाटनामुळे पाचशे तीस किलोमीटरचे अंतर हे केवळ 50 मिनिटात कापले जाणार असल्याचे सिंधिया यांनी संगीतले.

अलायन्स एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद यांनी सिंधुदुर्ग पासूनचा पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्ली इथे सुपूर्द केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग इथे महाराष्ट्रचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बोर्डिंग पास सुपूर्द करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा क्षण असल्याची भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली. या विमानतळाचे उद्घाटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, या विमानतळाच्या उद्घाटनामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी अशी आशा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकणच्या विकासासाठी सिंधुदुर्गचे विमानतळ निर्माण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.या विमानतळामुळे, कोकणाचे वैभव जगासमोर जाणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोकणात पर्यटनाला चालना द्यायची असेल, तर इथे, सुविधा यायला हव्यात विकासकामे व्हायालां हवीत, त्या विकासाकामांची सुरुवात आजपासून झाली आहे, असेही ठाकरे म्हणाले. इथे आणखी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Marathi, Jyotiraditya Shinde won hearts and minds, expecting to start 20 to 25 flights from Chippewa Airport in the next five years.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात