माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील कोळेकर वस्ती परिसरात वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या पिकाला आग लागली होती.Malegaon factory’s civil court rejects claim for damages
विशेष प्रतिनिधी
बारामती : माळेगावमध्ये उसाला आग लागली होती.ही आग विझविण्यासाठी अग्निशामक गाडी पाठवण्यात आली होती.आग विझवताना अग्निशामक गाडीला आग लागली.त्यामुळे गाडी जळून खाक झाली.तिच्या नुकसान भरपाईसाठी केलेला सहकारी साखर कारखान्याचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला.
माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील कोळेकर वस्ती परिसरात वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या पिकाला आग लागली होती. ती विझविण्यासाठी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी पाठविण्यात आली.
परंतु, वाऱ्याच्या वेगाने आग पसरल्यामुळे गाडीला देखील आग लागली होती. कारखान्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बारामती यांच्याविरुद्ध १२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा दिवाणी दावा दाखल केला होता.
कारखान्याने या गाडीचा इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता.दरम्यान विमा कंपनीला कारखानदार आरटीओने दिलेले अपघाताच्या दिवशीचे फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. तसेच, पूर्वीच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपलेली होती.
याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर वाहन चालविण्यासाठी असलेले परमीट अस्तित्वात धरले जात नाही, असा निष्कर्ष काढत न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी. एन. अरवड यांनी हा दावा फेटाळला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App