महाविकास आघाडी चपट्या पायाचे सरकार, दोन वर्षांपासून राज्याला पनवती, नितेश राणे यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वषार्पासून राज्याला पनवती लागली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केली आहे. सरकारला दोन वर्ष होऊन गेली. मात्र या सरकारने फक्त लोकांना फसवण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला.Mahavikas Aghadi flat-footed government, Nitesh Rane’s criticism

राणे म्हणाले, राज्यात घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला. त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसे द्यायचे, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे असल्याचे या कायद्यात नमूद करण्यात आले.



सर्वोच्च न्यायालयातही या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. या अगोदर राणे समिती स्थापन झाली आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले.

राज्य सरकार आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे.

सरकारने आता आरक्षण प्रश्नी भोसले समितीची स्थापना केली आहे. या भोसले समितीने काय दिवे लावले? याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Mahavikas Aghadi flat-footed government, Nitesh Rane’s criticism

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात