नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा चिपळूणात बिनघोर सुरू; मुंबईत राणेंच्या घरासमोर युवासैनिक – भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलीसांचा लाठीमार


विशेष प्रतिनिधी

चिपळूण – मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जो राजकीय तणाव निर्माण झालाय, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू असून त्यांचे चिपळूणात भव्य स्वागतही करण्यात आले. पण तिकडे मुंबईत नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर युवा सेनेचे सैनिक आणि भाजपमधील नारायण राणे यांचे समर्थक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. पोलीसांना लाठीमार करावा लागला. यात एक पोलीस जखमी झाला. Maharashtra: A clash breaks out amid Shiv Sena workers, BJP workers and Police in Mumbai as Shiv Sena workers marched towards Union Minister Narayan Rane’s residence.

नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.

वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीजार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे.



दरम्यान, नारायण राणे यांनी तत्परतेने एका पाठोपाठ एक ट्विट करून चिपळूणमधील कार्यक्रमांची माहिती आणि फोटो शेअर केलेत. जन आशीर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवशी चिपळूणच्या बहादूरशेख नाका येथे नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, खेर्डी ग्रामपंचायत तसेच मुस्लिम समाजातर्फे स्वागत करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून मानवंदना दिली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच चिपळूणमध्ये महाराष्ट्राच्या संकट काळात ज्या योध्यांनी खंबीर उभे राहून देवदूतासारखी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करत सत्कार केले, तसेच पेढे परशुराम ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमधून दिली.
-गुन्हाच केलेला नाही, ठाकरे सरकारला आव्हान
-माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्य सरकारने सुडाचे राजकारण करू नये, असा इशारा नारायण राणे यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमधून दिला.

Maharashtra: A clash breaks out amid Shiv Sena workers, BJP workers and Police in Mumbai as Shiv Sena workers marched towards Union Minister Narayan Rane’s residence.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात