संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान; एसटीला तब्बल १२०० कोटी रुपयांचा तोटा

वृत्तसंस्था

मुंबई :  गेल्या दोन महिन्यांहून सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे ( एसटी) मोठे नुकसान झाले असून तब्बल १२०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.loses Rs 1,200 crore due to staff strike; ST Corporation Vice President Shekhar Channe told

एसटीची बससेवा बंद असल्याने एकीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत. पण, विलीनीकरणासाठी कर्मचारी आडून बसले आहेत. त्यामुळे एसटीची चाके रुतली आहेत. कामावर हजर राहा, असे आवाहन करूनही कर्मचारी आपल्या मागणीवर कायम आहेत.दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्त केली असून, ३१२३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याचे ते म्हणाले.आता दररोज ३०० ते ४०० कर्मचारी रुजू होत आहेत. त्यामुळे २५० पैकी २१५ आगारांतून बससेवा सुरू झाली आहे.

आतापर्यंत २६ हजार ५०० कामगार रुजू झाले आहेत. गुरुवारी २१५ आगारांतून २३८२ बस धावल्या असून, ७१३८ फेऱ्यांमधून ४ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती चन्ने यांनी दिली.

loses Rs 1,200 crore due to staff strike; ST Corporation Vice President Shekhar Channe told

महत्त्वाच्या बातम्या