मोदींनी मुलगी मानलेय, त्यांना सोडून जाऊ कशी..? स्वामीप्रसाद मौर्य यांच्या कन्या खासदार संघमित्रा भाजपमध्येच राहणार!

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आहे. मात्र, त्यांची मुलगी खासदार संघमित्रा यांनी मात्र भाजप सोडणार नसल्याचे संकेत देत भावुक पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलगी मानलेय. त्यांना सोडून जाऊ कशी, असे म्हणत पंतप्रधांनाप्रति प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.Swami Prasad Maurya’s daughter MP Sanghamitra will remain in the BJP, said the Prime Minister considered me as daughter, how to leave him?

मैं कुछ मॉँगू और पुरा न हो, एैसे तो हालत नहीं, मैं पुकारूॅँ और पापा न सुने ऐसे तो हालत नहीं अशी सुरूवात करत खासदार संघमित्रा यांनी म्हटले आहे की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या वडलांकडून घेतलेल्या वचनाने बांधली गेलेली आहे. वडील-मुलीचे नाते हे जगातील सर्वात मजबूत नाते आहे.माझ्या वडलांशी जसे मुलगी म्हणून माझे नाते आहे तसेच पंतप्रधानांशीही नाते आहे. सोशल मीडियावर माझ्यावर होणाºया टीकेनंतर मी काही निर्णय घेण्याचा विचार जरी केला तरी माझ्या कानावर पंतप्रधानांचे शब्द गुंजत राहतात. त्यांनी माझ्या वडलांना सांगितले होते की ही आता माझी मुलगी आहे. ही मुलगी मी तुमच्याकडून घेतली आहे.

खासदार होण्यापूर्वी आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. खासदार झाल्यावर संसदेतील जबाबदाऱ्या सांभाळत जनतेसाठी काम करत होते. हिच जबाबदारी भविष्यातही निभावेल. लोकांच्या हक्कांसाठी लढत राहिल.

याचबरोबर त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेरे पिता मेरे अभिमान है, मेरे हिरो है, पार्टी अलग हो सकती है लेकिन पिता-पुत्री नहीं. उत्तर प्रदेशात सध्या बोलभांडांचीच चलती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा परिवार मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, छोट्या विचारांच्या लोकांना हे पटत नाही. उत्तर प्रदेशात हेच छोट्या विचारांचे लोक काम करत आहेत. मात्र, तरीही आपल्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे जय भाजपा, तय भाजपा…

Swami Prasad Maurya’s daughter MP Sanghamitra will remain in the BJP, said the Prime Minister considered me as daughter, how to leave him?

महत्त्वाच्या बातम्या