विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : कार्तिकी यात्रेत लाखो भाविक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात. स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले. Looting on Karthiki Yatra; 21 arrested
उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने शहरात गर्दीचे ठिकाण असलेले विठ्ठल मंदिर परिसरात वाळवंट चौफळा स्टेशन रोड प्रदक्षिणामार्ग याठिकाणी करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले.
यात चौदा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरटेसह तीन मोबाईल जप्त करण्यात आले . यात्रा कालावधीमध्ये भाविकांची लूट होऊ नये म्हणून पंढरपूर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App