एकनाथ शिंदेंविरोधातील कारवाईला कायद्याने उत्तर; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षनेते पदावरुन हटवले. शिवसेनेने केलेल्या कारवाईला कायदेशीर उत्तर देण्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. Legal response to action against Eknath Shinde; Deepak Kesarkar’s warning to Shiv Sena

हे शिवसेनेला शोभणारे नाही 

दीपक केसरकर म्हणाले की, पक्षनेते पदावरुन हटवण्यासाठी ज्या पद्धतीचे पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले ते आक्षेपार्ह असल्यामुळे त्या पत्राला रीतसर उत्तर आम्ही आधी पाठवू आणि त्या उत्तरावर जर उद्धव ठाकरेंनी कारवाई बदलली नाही, तर त्यावर आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू. खरंतर अशी कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही, असे केसरकर यावेळी म्हणाले. मुंबईत परतण्यापूर्वी केसरकरांनी ही पत्रकार परिषद घेतली.

…म्हणून आजही आम्ही शिवसैनिक

तसेच, केसरकरांनी शिवसेनेने काढलेल्या प्रतिज्ञापत्रावरही टीका केली आहे. एखाद्या माणसाला एखाद्या पक्षात राहायचे असेल तर त्याला एक प्रेमाचं बंधन बांधावं लागतं आणि आम्ही आजपर्यंत समजत होतो की शिवबंधन हेच खरे प्रेमाचे बंधन जे आजसुद्धा माझ्या हातात आहे आणि ही बाळासाहेबांची आठवण म्हणून आमच्या हातात आहे. म्हणूनच आजही आम्ही शिवसैनिक आहोत. हे प्रेमाचं बंधन बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर घातलं होतं.

केसरकांचा स्वाक्षरी मोहिमेवर हल्लबोल

आता घेतलं जाणारं प्रतिज्ञापत्र ही केवळ दिशाभूल आहे. या प्रतिज्ञापत्रासाठी कार्यकर्ते 100 रुपये काढणार आहेत. शिवसेनेचा कार्यकर्ता हा एक निष्ठावंत कार्यकर्ता असतो. तो वडापाव खाऊन आमचा प्रचार करत असतो. 20 रुपयाला एक वडापाव येतो त्या कार्यकर्त्याला तुम्ही 100 रुपयांचे प्रतिज्ञापत्र द्यायला सांगता, असं म्हणत केसरकर यांनी शिवसेनेने काढलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर हल्लाबोल केला आहे.

Legal response to action against Eknath Shinde; Deepak Kesarkar’s warning to Shiv Sena

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात