कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी लता मंगेशकर यांच्याकडून 7 लाख रुपयांची मदत


वृत्तसंस्था

मुंबई : कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.Lata Mangeshkar for the fight against Corona Assistance of Rs. 7 lakhs from

कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन केला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे.



नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

Lata Mangeshkar for the fight against Corona Assistance of Rs. 7 lakhs from

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात