मला मारण्यासाठी अगदी दाऊदला पाठवले तरी, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच – सोमय्या

विशेष प्रतिनिधी

ठाणे : राज्यात ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणले जात आहेत. त्यामुळे एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाने दूरध्वनीवरून मला ठार मारण्याची धमकी दिली. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी माणसे पाठविण्यात आली होती. त्यामुळे मला मारण्यासाठी अगदी दाऊदला पाठवले तरी, मी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. Kirit sommya targets govt.ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची नावे याआधीच घोषित केल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे १२ मंत्री हे भ्रष्टाचारी असल्याचा सनसनाटी आरोप केला. ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची सोमय्या यांनी भेट घेतली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘विहंग गार्डन’ येथे केलेल्या बेकायदा बांधकामावरील २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

Kirit sommya targets govt.

महत्त्वाच्या बातम्या