भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान; केंद्र सरकारकडून ४० जवानांचे सुरक्षा कवच

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून ४० जवानांचे सुरक्षा कवच त्यांच्या दिमतीला देण्यात आले आहे. BJP leader Kirit Somaiya provided Z security; Central Government provides security cover of 40 personnel

ठाकरे- पवार सरकारमधल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर धमक्या आल्याचा दावा सोमय्या यांनी केली तसेच सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतल्या नेत्यांविरोधात मोहीम चालू केली आहे.

अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यांची मागणी केंद्र सरकारने तात्काळ मान्य करून झेड सुरक्षा पुरवली आहे.

BJP leader Kirit Somaiya provided Z security; Central Government provides security cover of 40 personnel

महत्त्वाच्या बातम्या