करिश्मा गवई छळ प्रकरण, 34 वर्षाच्या प्राध्यापिकेचे 22 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर प्रेम जडले, पण लग्नानंतर त्याने तिला पैशासाठी छळले


विशेष प्रतिनिधी

नागपूर : विधी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या 34 वर्षीय तरुणीचे आपल्याच 22 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर प्रेम जडले.घरच्यांनाही त्यांचे लग्न लावून दिले.मात्र लग्नानंतर या तरुणाने प्राध्यापिकेला हुंड्यासाठी छळल्याचा प्रकार समोर आला आहे.धक्कादायक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे.Karisma Gawai harassment case, 34-year-old professor fell in love with 22-year-old students, but after marriage he harassed her for money

नामवंत कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि स्वत:ही वकील असलेल्या करिश्मा गवई – दरोकर यांनी पती तसेच सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून महिलेच्या सासू-सासऱ्यांसोबत त्यांच्या दोन नातेवाइकांनाही अटक केली. मुख्य आरोपी फरार आहे. पलाश पुरुषोत्तम दरोकर (वय २२) असे त्याचे नाव आहे. तो विधी शाखेच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून 22 वर्षाचा आहे. करिश्मा यांचे वय 34 असून त्या वकील आहेत.

विधी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.त्या शिकवित असलेल्या महाविद्यालयात शिकायला असलेल्या पलाशसोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला. प्रेमविवाहानंत पलाश आणि त्याचे वडील पुरुषोत्तम दरोकर, सासू ललिता तसेच दोन मामा संजय आणि प्रशांत टोंगसे (सर्व रा. सद्भावनानगर, ओंकारनगर) शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ करू लागले.

त्यामुळे करिश्मा यांनी तीन दिवसांपूर्वी सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. हुंड्यासाठी छळ करताना आरोपी नवरा, सासू सासरे आणि नवऱ्याचे दोन मामा जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी या प्रकरणात पलाश वगळता अन्य आरोपींना अटक केली आहे.

Karisma Gawai harassment case, 34-year-old professor fell in love with 22-year-old students, but after marriage he harassed her for money

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था