यासिन मलिकनेच केले होते माजी सीएम सईद यांच्या मुलीचे अपहरण; 32 वर्षांनंतर रुबिया सईदने कोर्टात पटवली ओळख


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी रुबिया सईद हिचे फुटीरतावादी नेता यासिन मलिकने अपहरण केले होते. रुबियाने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर तिच्या साक्षीत यासिन मलिकसह चार दहशतवाद्यांची ओळख पटवली, ज्यांनी तिचे अपहरण केले होते. रुबिया पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या बहीण आहेत.It was Yasin Malik who abducted the daughter of former CM Saeed; After 32 years, Rubia Saeed proved her identity in court

या प्रकरणात पहिल्यांदाच रुबियांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या सध्या तामिळनाडूमध्ये राहतात. 8 डिसेंबर 1989 रोजी रुबियाचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी 13 डिसेंबरला सरकारला 5 दहशतवाद्यांची सुटका करावी लागली. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद हे भारताचे गृहमंत्री होते. सीबीआयने 1990च्या दशकाच्या सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.



छायाचित्रांवरून ओळखले

रुबियाचे वकील अनिल सेठी यांनी सांगितले की, मी सीबीआयसमोर दिलेल्या आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. सीबीआयच्या तपासादरम्यान दिलेल्या छायाचित्रांच्या आधारे तिने यासिन मलिक आणि अन्य तिघांची ओळख पटवली. अपहरणाच्या 31 वर्षांनंतर न्यायालयाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मलिक आणि इतर नऊ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

पुढील सुनावणी 23 ऑगस्टला

सेठी यांच्या म्हणण्यानुसार, पुढील सुनावणीची तारीख 23 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. रुबियाही पुढील तारखेला उपस्थित राहणार आहे. यासीन मलिकने स्वत:ला स्वत:ला जम्मूला उलटतपासणीसाठी घेऊन जाण्याची मागणी केली आहे. मात्र, यासीनला जम्मूमध्ये आणले जाईल की नाही, याबाबत माहिती मिळालेली नाही.

काय घडले होते?

८ डिसेंबर १९८९ रोजी श्रीनगरच्या सदर पोलीस ठाण्यात रुबिया सईदच्या अपहरणप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरच्या प्रतीनुसार, ती श्रीनगरमधील हॉस्पिटलमधून ट्रान्झिट व्हॅनमधून नौगामला घरी जात होती. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती.

लाल चौकातून जात असताना व्हॅन चानपुरा चौकाजवळ आली. त्यातील तीन जणांनी बंदुकीच्या जोरावर व्हॅन थांबवली आणि रुबियाचे अपहरण केले. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात जेकेएलएफ (जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट) ने हमीद शेख, अल्ताफ अहमद भट्ट, नूर मोहम्मद, जावेद अहमद जरगर आणि शेर खान या पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची अट ठेवली होती. अट पूर्ण झाल्यानंतरच रुबियाला सोडण्यात आले.

काश्मिरी पंडितांच्या हत्येचाही यासीन मलिकवर आरोप

यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता असून तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. काश्मीरच्या राजकारणात ते नेहमीच सक्रिय राहिले आहेत. तरुणांना भडकवण्याचा आणि हातात बंदूक घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

यासीनवर पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचाही आरोप आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या करून त्यांना खोरे सोडण्यास भाग पाडण्यातही यासिनचा हात होता.

It was Yasin Malik who abducted the daughter of former CM Saeed; After 32 years, Rubia Saeed proved her identity in court

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात