एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; ९३ हजार कर्मचाऱ्यांचा हा रखडलेला प्रश्न अखेर सुटला

  • राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. Important news for ST employees; This stalemate of 93,000 employees was finally solved

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.अनिल परब यांनी माहिती दिली की , लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल. तसेच थकीत वेतन मिळणार आहे.चालक आणि वाहक यांचे वेतनवाढ, बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च, इंधन दरवाढ या सर्व गोष्टींचा विचार करुन २०१३-१४पासून वाढीव दराने अनुदान विषयी मंत्री परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतल्या.

एसटी महामंडळास एकूण ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० इतका निधी मंजूर करुन दिला. मे २०२१ महिन्यात पहील्या टप्यातील १९७ कोटी ५८ लाख ४० हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापर्वीच एसटी महामंडळाला मिळाली आहे.

तसेच दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख २२ हजार २०० रूपयांचा निधी एसटी महामंडळाला देण्याबाबत निर्देश संबंधित विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. या निधीमधून एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

Important news for ST employees; This stalemate of 93,000 employees was finally solved

महत्त्वाच्या बातम्या