एसटीची लालपरी टाकणार कात, एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार १५० आधुनिक इलेक्ट्रिक बस


विशेष प्रतिनिधी

नागपूर – एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या आठ महिन्यांत १५० इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल होणार असून, भविष्यात दोन हजार इलेक्ट्रिक वातानुकूलित बस चालवण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानकात नव्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. 150 Electric buses will include in ST service

पहिल्या टप्प्यात येणाऱ्या १५० इलेक्ट्रिक वातानुकूलित बस औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर या विभागांमध्ये चालवण्यात येणार असून, त्यांच्या फेऱ्यांचे यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे.

किमान ४०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर अपेक्षित असून ३०० किलोमीटर अंतरावर बस चार्जिंग स्टेशन अपेक्षित आहे. त्यासाठी औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित विभागांमध्ये नव्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

बसकरिता असलेला परवाना, रस्ते कर, टोलशुल्क, उच्चदाबाची विद्युत वाहिनी आगारापर्यंत आणून देण्याचा खर्च व इतर खर्च हा महामंडळाकडून केला जाणार आहे; तर बसची व चार्जरची मालकी बसपुरवठादाराची राहणार आहे.

150 Electric buses will include in ST service

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात