आता राहुल गांधींची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातीही लॉक होणार? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची मागणी

now ncpcr writes to facebook instagram as rahul gandhi posts on delhi rape victim still visible

rahul gandhi posts : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट लॉक झाल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. आता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधींच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. now ncpcr writes to facebook instagram as rahul gandhi posts on delhi rape victim still visible


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट लॉक झाल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. आता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधींच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला लिहिले आहे की, राहुल गांधींनी बलात्कार पीडितेच्या पालकांची ओळख उघड करून पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात ट्विटरने राहुल गांधींचे हँडल आधीच लॉक केले आहे. राहुल गांधीव्यतिरिक्त काँग्रेसचे 20 नेते आणि पक्षाचे 7 ट्विटर हँडलदेखील लॉक करण्यात आले आहेत.

ट्विटरची एनसीपीसीआरच्या तक्रारीवर कारवाई

राहुल गांधींनी अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. बलात्कार आणि खुनानंतर ओल्ड नांगल स्मशानभूमीत पालकांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार पार पडले होते. भाजपने आरोप केला की, गांधींनी पीडित कुटुंबाची ओळख उघड केली आहे, जे बेकायदेशीर आहे. एनसीपीसीआरच्या तक्रारीनंतर गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले.

दुसरीकडे, राहुल गांधींनी आरोप केला आहे की, ही अमेरिकन कंपनी पक्षपाती आहे, ती भारताच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे आणि सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे. ट्विटरने जे केले ते भारताच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याचा दावाही त्यांनी केला.

now ncpcr writes to facebook instagram as rahul gandhi posts on delhi rape victim still visible

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात