सकाळी 6 पर्यंत काम करता, तर उठता कधी?:अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली- लय पुढचं बोलाय लागलेत


प्रतिनिधी

जळगाव : नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावर सकाळी 6 वाजेपर्यंत काम केलं तर हा बाबा उठतो कधी? झोपतो कधी?, असा प्रतिप्रश्न करत अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली.If you work till 6 in the morning, when do you wake up? Ajit Pawar mocked Chief Minister Shinde – Lay started talking next.

जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शिंदे सरकारसह बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे पैठण येथील भाषण मीही ऐकले. म्हणे मी सकाळी 6 पर्यंत काम करतो. 6 पर्यंत काम केल तर हा बाबा उठतो कधी? 6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? काही कळल पाहिजे ना. पटेल असं बोला ना राव. लयच पुढचं बोलाय लागलेत.



माणूस 24 तास काम करू शकतो का?

पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी बहीण म्हणाली होती की मी सकाळी 6 ला उठून काम करतो. आता आहे सवय. वाईट आहे का? त्यावरही मुख्यमंत्री म्हणतात, मी सहाला उठतो. माणूस 24 तास काम करु शकतो का? फार फार तर एक, दोन दिवस तो अशा पद्धतीने काम करु शकतो. किंवा सुरतला गेल्यावर एखाद पद मिळेल म्हणून जागू शकतो. पण नंतर कधीतरी मेंदू म्हणेलच अरे बाबा झोप, झोप. सहा तास त री झोप पाहिजेच ना.

…तर बोलावं लागेलच ना

अजित पवार म्हणाले, आम्ही शरद पवार साहेबांना 55 वर्षांपासून काम करताना पाहतोय. रात्री 2 ला झोपले तरी साहेब सकाळी 7 ला तयार रहायचे. पण मध्ये पाच, सहा तासांची झोप व्हायचीच ना. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आहेच. पण तुम्ही काहीही न पटण्यासारख बोलायला लागला तर आम्हालाही बोलाव लागेलच ना.

दादा भुसे कर्णाचा दुसरा अवतार

शिंदे-फडणवीस सरकारमधील जवळपास 14 मंत्र्यांनी अजून आपल्या खात्यांचा कारभारच न स्वीकारल्याबद्दलही अजित पवारांनी जोरदार टोले लगावले. पवार म्हणाले, अनेक मंत्र्यांच्या वाटेला नको ती खाती आली आहेत. ज्यांना कृषि खाते हवी होते, त्यांना खनिज आणि बंदरे दिली. आता दादा भुसेंचा खनिजाशी काय संबंध? त्यांच्याकडे एकतरी बंदर आहे का? याबाबत मी दादा भुसेंना विचारलं तर भुसे म्हणतात, मीच सांगितल होत मला साधे खाते द्या. म्हटलं भुसे एवढा मोठा माणूस कधी झाला. कर्णाचा दुसरा अवतारच जणू काही

40 जणांना आवरणार कोण?

पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधील एक आमदार गोळीबार करतो, अमरावतीमधील एक खासदार पोलिसांनी हुज्जत घालते, एक जण विरोधकांच्या तंगड्या तोडायची भाषा करते. एवढे होऊनही फडणवीस, शिंदे काहीच बोलत नाही. मविआ सरकारच्या काळात काँग्रेसमधील कुणाच चुकल की सोनिया गांधींचा निरोप यायचा आणि सगळ व्यवस्थित व्हायच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी चुकीच केल तर शरद पवार सूचना करायचे आणि ती चूक दुरुस्त व्हायची. शिवसेनेमधील कुणी चुकीच वागल की उद्धव ठाकरे त्यांना आवरायचे. पण, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कुणी कुणाला सांगायच? हा प्रश्नच आहे. सर्वच्या सर्व 40 बंडखोर म्हणतात आम्हीच मुख्यमंत्री. वर म्हणताय काय, आमचे सरकार सर्वसामान्यांचे. अरे मग आमचे सरकार सामान्यांचे नव्हते काय? आम्ही काय वरुन पडलो होतो का?

If you work till 6 in the morning, when do you wake up? Ajit Pawar mocked Chief Minister Shinde – Lay started talking next.

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात