मी स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंचा हात वर केले, त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते; फडणवीसांनी आरोप करू नयेत; शरद पवारांचे वक्तव्य


प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडलीत. हरकत नाही पण त्यात ते जे म्हणालेत ना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. या आरोपात तथ्य नाही, कारण मी सांगतो की मी स्वतःच सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचे. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हते अन् मनीही नव्हते, अशा शब्दांत मुख्यमंत्रीपदाच्या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे.I personally raised the hand of Uddhav Thackeray for the post of Chief Minister



पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, तेव्हा मीच म्हणालो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. माझी देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरेच काही माहिती आहे, असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, की ती वसूली चीप किंवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावे. ते स्वतः मुख्यमंत्री होते. त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी देखील त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवले. हे ऋणानुबंध जुने आहेत. ते म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

I personally raised the hand of Uddhav Thackeray for the post of Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात