राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो, अंतिम विजय हा आपलाच आहे – प्रविण दरेकर


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.I condemn this policy of the state government, the final victory is ours – Pravin Darekar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो. कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी. अंतिम विजय हा आपलाच आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन या निमित्ताने करतो.

ते पुढे म्हणाले, आज मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता राज्यभर पसरले आहे. सरकार मात्र यातून काही मार्ग काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान करीत आहे. असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

I condemn this policy of the state government, the final victory is ours – Pravin Darekar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी