पुण्यातील दुहेरी हत्याकांडातील पतीचा मृतदेह आढळला; हत्याकांडाचे गूढ आणखी वाढले


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यातील मायलेकराच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील बेपत्ता पतीचा मृतदेह खडकवासला नजीक असलेल्या खानापूर गावाजवळ आढळला आहे. त्यामुळे या तिन्ही हत्यांचे गूढ आणखी वाढले आहे. Husband’s body found in Pune double murder; The mystery of the massacre grew even more

आबिद शेख (वय ३५ )असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना करण्यात आली होती.  आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेख कुटूंब मुळचे मध्य प्रदेशातील असून २००७ पासून नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. काही दिवसांपूर्वी ते धानोरीतून चऱ्होलीमध्ये रहायला गेले होते. आबिद शेख कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मुलगा ऑटिझमने त्रस्त होता. त्याचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षापूर्वी नोकरी सोडली होती. मुलाच्या आजारामुळे कुटुंब तणावात होते. त्याला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षकाची नियुक्ती केली होती. आलिया शेख यांचे वडिल मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडिल जिल्हा योजना नियोजन केंद्रात अधिकारी होते. त्याचा भाऊ कॅनडामध्ये स्थायिक आहे.

आबिदने ११ जूनला  गाडी भाड्याने घेतली होती. त्यानंतर तो ११ ते १४ जून पर्यंत सलग सहकुटूंब घरातून बाहेर घेऊन जात होता. सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी ते पुन्हा घरी येत होते.  मात्र १४ जून रोजी आबिद सहकुटूंब सासवड-दिवेघाट-बनेश्वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेले. तेथे त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आलियाचा मृतदेह सापडला होता. आदिबने गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून झाला असावा. यानंतर 15 जूनला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केटयार्ड येथे सोडून स्वारगेटच्या दिशेने पायी चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांना गाडीमध्ये दोन लोखंडी पाईप सापडले असून मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्यही आढळले आहे. गाडीच्या मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. तसेच गाडीमध्ये तिघां व्यतिरिक्त आणखी कोणी नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे संशयाची सुई आबिदकडे  होती.  आता त्याचाच मृतदेह आढळल्याने या घटनेचे गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालात आलियाला जबर मारहाण केल्याने आणि आयानचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

Husband’s body found in Pune double murder; The mystery of the massacre grew even more

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती