होम आयसोलेशन बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पुण्याच्या महापौरांचा तीव्र विरोध


वृत्तसंस्था

पुणे : होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे. Home quarantine Cancelation Decision is Not Acceptable : Pune Mayor Murlidhar Mohol

पुण्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना पुन्हा नव्याने हा नियम लागू करणे अयोग्य आहे. होम आयसोलेशनच्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण आणि त्यांची व्यवस्था करणं शक्य नाही.



रुग्णांची संख्या वाढत गेल्यास जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नव्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मोहोळ यांनी केली.
राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच कोविड सेंटर वाढवून रुग्णांना आयसोलेशन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे होम आयसोलेशन बंद करण्याच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध दर्शवला आहे.

Home quarantine Cancelation Decision is Not Acceptable : Pune Mayor Murlidhar Mohol

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात