Hijab Controversy : हिंदु हातावर हात धरून राहिले, तर ३० वर्षांनंतर आपल्या पोरींनाही हिजाब घालावा लागेल, अनिल बोंडेंचा इशारा


विशेष प्रतिनिधी

अमरावती : कर्नाटक हायकोर्टाने शाळांमध्ये हिजाब बंदीचा निकाल दिल्यानंतरही त्यावर इस्लामी संघटना धमक्या देत असताना महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि हिंदु समाज हातावर हात धरून गप्प राहिला तर आपल्या पोरींनाही ३० वर्षांनी हिजाब घालावा लागण्याची परिस्थिती येईल, असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. Hijab Controversy: If Hindus hold hands, after 30 years, their children will also have to wear hijab, warns Anil Bonde

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1505762245854203909?s=20&t=w7o61FlWzYswO_o0fKjOjA

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे म्हणाले, की परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर हातावर हात देऊन आपण बसून राहिलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला. तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली. शिवाजी महाराज अयोध्या, मथुरा आणि काशी विश्वनाथ येथे असते तर चित्र वेगळे दिसले असते. पण तेव्हा तिथे शिवाजी महाराज नव्हते, मंदिराच्या बाजूला मशिदी तयार झाल्या, असे अनिल बोंडे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या ताकदीने करावा, असं आवाहन बोंडे यांनी केले. ते म्हणाले, की एक गोष्ट लक्षात ठेवा. अमरावतीला आम्ही होतो. त्यावेळी आम्ही समर्थपणे ताकद दाखवली. तेव्हा ते तरुण होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा आणि तुळजापूरची भवानी वाचली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपले पोरं पोरी मजबूत राहिले पाहिजे, याचंही भान ठेवलं पाहिजे.

Hijab Controversy : If Hindus hold hands, after 30 years, their children will also have to wear hijab, warns Anil Bonde

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात