बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला


वृत्तसंस्था

मुंबई : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा उष्मा देखील वाढला आहे. Rainy weather in Maharashtra due to cyclone in Bay of Bengal; cold , heat also increased

बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळामुळे तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज आहे. रविवारी विदर्भ, मराठवाडय़ात उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.



बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर २१ मार्चला चक्रीवादळात होणार आहे. दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती कायम राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही झाला. अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

Rainy weather in Maharashtra due to cyclone in Bay of Bengal; cold , heat also increased

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात