वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा, या बाबत आता नवा सल्ला दिला आहे. त्या अंतर्गत आता लसीचा डोस हा ८ ते १६ आठवडय़ांच्या दरम्यान देण्याची शिफारस लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने केली. Second covishield dose can be taken between 8 16 weeks after first dose
सध्या कोव्हिशिल्डची दुसरा डोस पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यादरम्यान देण्यात येतो. लसीकरणाबाबतची देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘एनटीएजीआय’ने केलेली ‘कोव्हिशिल्ड’बाबतची ही शिफारस अद्याप लागू करण्यात आलेली नाही. परंतु, अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत निर्णय घेतल्यास देशातील सहा ते सात कोटी लोकांना कोव्हिशिल्डची दुसरा डोस वेगाने देता येईल.
कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील कालावधी कमी करण्याबाबतची ‘एनटीएजीआय’ची नवी शिफारस जागतिक शास्त्रीय पुराव्यांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. लस अगोदर किंवा नंतर दिली तरी अँटिबॉडीज रिस्पॉन्स जवळजवळ समान असतात, असे या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.
लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (‘एनटीएजीआय’ने) अद्याप भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा घेण्याबाबत कोणताही बदल सुचवलेला नाही. या लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी दिली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App