युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे रशियाने राजधानी किव्हवर हवाई हल्ले वाढवीले आहेत. Ukraine rejects offer of surrender; Russia launches air strikes on Kiev

युक्रेनच्या मारियुपोल शहराच्या अंतिम कब्जासाठी रशियाने दिलेली आत्मसमर्पण मुदत संपली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने रविवारी रात्री मारियुपोल प्रशासनाला मॉस्को वेळेनुसार पहाटे ५ वाजता (भारतीय वेळेनुसार ८ वाजता) आत्मसमर्पण करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, युक्रेनने हा प्रस्ताव आधीच धुडकावून लावला आहे.सीएनएनच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रशियाने आक्रमण रोखावे.



दुसरीकडे, रशियन सैन्याने रविवारी रात्री राजधानी कीव्हमधील निवासी भागावर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला असून अनेक घरे आणि एक शॉपिंग मॉल उद्ध्वस्त झाला आहे. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेने मॉलच्या ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढले आहे. तसेच एका शाळेवर हल्ला केला.

Ukraine rejects offer of surrender; Russia launches air strikes on Kiev

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात