राज्यात आजही मुसळधार पाऊस,उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट !


 

राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.Heavy rains in the state even today, yellow in North Maharashtra and orange alert in Vidarbha


विशेष प्रतिनिधी

 मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दांडी मारली  होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे.  सध्या राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला असून आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.



उत्तम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे. धुळे नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड उस्माबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.या काळात काही ठिकाणी अतिवृष्टीचा शक्यता आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

20 ऑगस्टला (आज) राज्यातील पावसाची स्थिती नेमकी काय असेल ?

20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज  हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Heavy rains in the state even today, yellow in North Maharashtra and orange alert in Vidarbha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात