“पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही भरपाई शासनाने द्यावी”- पंकजा मुंडे


नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.”Government should compensate the loss of agricultural land along with crops” – Pankaja Munde


विशेष प्रतिनिधी

परळी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे.या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे.या मुसळधार पासवामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता.२८) भर पावसात दौरा केला. यादरम्यान गावात जाऊन पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.सोमवारपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे.



नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे.

ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील हे विदारक चित्र पाहून पंकजा मुंडे यांनी भर पावसात मंगळवारी नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या.

नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंकजा मुंडे यांनी त्यांना धीर दिला. जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“Government should compensate the loss of agricultural land along with crops” – Pankaja Munde

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात