India’s Top Richest List 2021 :  मुकेश अंबानी आशियातील गर्भश्रीमंत, अदानी यांच्या संपत्तीमध्ये दररोज १००२ कोटी रुपयांची पडतेय भर 


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनात देशातील सामान्य जनता रस्त्यावर आली आहे. दुसरीकडे मात्र, भारतीय श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ होत आहे. Hurun India ने आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहेत. त्यात रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे टॉपवर आहेत. विशेष म्हणजे सलग दहाव्या वर्षी त्यांनी आपले नाव यादीत सर्वोच्च स्थान कायम ठेवतर आहे. दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आहेत.  त्यांच्या संपत्तीत दररोज १००२ कोटींची भर पडत आहे. Mukesh Ambani is Richest man, Adani’s wealthadds Rs 1,002 crore daliy

IIFL वेल्थ ह्युरन इंडियाने आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत गौतम अदानी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजच्या कमाईत गौतम अदानीं यांनी मुकेश अंबानीना मागे टाकल आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानींची संपत्ती रोज १६३ कोटी रुपयांनी वाढली तर  गौतम अदानींची संपत्ती रोज १००२ कोटींनी वाढली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत अशा १००७ लोकांच्या यादीत २५५ जण मुंबईतील आहेत. १६७ जण दिल्ली आणि ८५ जण बंगळुरुमधील आहेत.गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षी ३.६५.७०० कोटी रुपयांनी वाढली आहे. पण,मुकेश अंबानींनी या यादीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवले आहे. त्यांची संपत्ती ही ७,१८,०००कोटी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत  त्यामध्ये ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत २६१ टक्क्यांनी वाढली. अदानींची संपत्ती ही १.४०,२०० कोटींवरुन५.०५,९०० कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात संपत्तीत ३,६५,७०० कोटींची भर पडली आहे.
श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर एचसीएलचे शिव नाडर आहेत. त्यांची संपत्ती ७६ टक्क्यांनी वाढली असून ती २,२३,६०० कोटी झाली आहे.

महिला उद्योगपती मागे नाहीत

महिला उद्योगपतींचा विचार करता गोदरेज ग्रुपच्या तिसऱ्या पीढीतील सदस्या स्मिता व्ही कृष्ण या सर्वात वरच्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ३१,३०० कोटी आहे. दुसऱ्या स्थानी किरण मुजुमदार शॉ आहेत. त्यांची संपत्ती २८,२०० कोटी रुपये आहे.

Mukesh Ambani is Richest man, Adani’s wealthadds Rs 1,002 crore daliy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण