एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा माहेरी; टाटा सन्सकडे आली मालकी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – तब्बल ६७ वर्षांनंतर एअर इंडिया माहेरी आली आहे…!! देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या निर्गुंतवणूक समितीने टाटा सन्सच्या निविदेला मंजूरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Air India Maheri again after 67 years; Ownership came to Tata Sons

२०१८ मध्येही एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्याचा सरकारने प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला यश आले नव्हते. आता २०२१ मध्ये मात्र एअर इंडियामधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया यशस्वी ठरताना दिसत आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या.



त्यामध्ये टाटा सन्सबरोबरच स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सने बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळेच एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये केद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

टाटा समूहाने जेआरडी टाटांच्या नेतृत्वाखाली १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. जेआरडींनी कराची ते मुंबई असे पहिले उड्डाण केले होते. त्यानंतर कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणात भारत सरकारने १९५३ साली टाटा एअरलाइन्स ताब्यात घेऊन तिचे नामांतर एअर इंडियामध्ये केले होते..

Air India Maheri again after 67 years; Ownership came to Tata Sons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात