आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.Good news! Slum dwellers in Pune and Pimpri-Chinchwad will get 300 square feet flat, Guardian Minister announces
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारने पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित बांधकाम नियमावलीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे . त्यानंतर नियमावलीचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान यावर नागरिकांचे मत काय आहे याबद्दल माहिती घेतली गेली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात अनेक बदल करण्यात आले होते. यामध्ये झोपडीधारकांना २६९ चौरस फुटांऐवजी ३०० चौरस फूट घर मिळेल. यासाठी केवळ ५१ टक्के लोकांनी सहमती दिली असली तरी ही योजना राबवण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रलंबित आहेत. शहरांमध्ये सुमारे ६०० झोपडपट्ट्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही शहरे झोपडपट्टीमुक्त होण्यास चालना मिळू शकेल. ३०० फुटांचे घर मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा नागरिकांना फायदा होईल.
अजित पवार यांनी घर धारकांना नव्या घरात प्रवेश करुन चांगल्या जीवनाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला. ज्यांना घर मिळणार आहे त्यांनी ते विकण्याचा विचार करू नये. तुम्हाला सगळ्यांना सन्मानाने जगता यावे, म्हणून ही योजना आणण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी दिली आहे .पुणेकरांच्या नावाला धक्का लागता कामा नये.तसेच पुण्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सहकार भवन, कामगार भवन, कृषी भवन पुण्यात निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App