शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स, 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश


वृत्तसंस्था

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स पाठविले असून 4 ऑक्टोबर रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मंगळवारी भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता भावना गवळींना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ED summons Shiv Sena MP Bhavana Gawli to appear on October 4

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन आदी 9 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.ही कारवाई 30 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. दरम्यान, काल मंगळवारी परभणी जिल्ह्यातील पाथरी याठिकाणी ईडीने कारवाई करून भावना गवळींचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे या कंपनीचे संचालक आहेत.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे पत्रकार परिषद घेऊन गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली.

दरम्यान, 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत.

ED summons Shiv Sena MP Bhavana Gawli to appear on October 4

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण