खुशखबर ! राज्यसेवा परीक्षेच्या वाढल्या १०० जागा

आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढत एकूण २० संवर्गात ३९० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास १ ( गट अ च्या ) १०० जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे.Good news! Increased 100 seats in State Service Examination


विशेष प्रतिनिधी

पुणे : आता MPSCकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे.आधी २९० पदासाठी जागा होती परंतु आता १०० पदे वाढल्यामुळे ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

दरम्यान आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढत एकूण २० संवर्गात ३९० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास १ ( गट अ च्या ) १०० जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे.पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7 ते 9 मे 2022 या तीन दिवस करण्यात आली आहे. २०२१ च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास ५ ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Good news! Increased 100 seats in State Service Examination

महत्त्वाच्या बातम्या