नाना पटोलेंचा थेट उच्च न्यायालयात दावा , म्हणाले – नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवली


दरम्यान, न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.Nana Patole’s direct claim in the High Court, said – Nitin Gadkari concealed the true details of income


विशेष प्रतिनिधी

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर आज शुक्रवारी हायकोर्टात न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली.यात, गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील ॲड. सतीश उके यांनी केला आहे.दरम्यान, न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.पुढे ॲड उके म्हणाले की , गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. त्यामुळे मतदारांना सत्य माहिती कळू शकली नाही.

तसेच ॲड उके यांनी न्यायालयात सांगितले की , नितीन गडकरी यांनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केलाय परंतु त्यांच्या नावावर कसलीच शेती नाही. गडकरींनी प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ चार ते पाच कोटी रुपयाची मालमत्ता दाखवली आहे, त्यांची मालमत्ता हजारो कोटीत आहे, असेही ॲड. उके यांनी सांगितले.

Nana Patole’s direct claim in the High Court, said – Nitin Gadkari concealed the true details of income

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*