MPSC Updates : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2021 च्या परिक्षेची जाहिरात प्रसिद्ध, पूर्व परीक्षा 2 जानेवारी रोजी


विशेष प्रतिनिधी

मुबंई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 बद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्वजण ह्या जाहिरातीची वाट पाहत होते. कारण मागील 2 वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झालेली नव्हती. अखेर 2021 ची मेगा भरतीचे वेळापत्रक एमपीएससी मार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPDC Updates : MPSC announces advertisement for state service examination 2021, Pre examination on Jan 2, 2022

राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 रोजी एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा घेतली जाईल. साधारण परीक्षेच्या तीन महिन्याआधी एमपीएससीने वेळापत्रक जाहीर केले आहे. आता एमपीएससीनं 2021 चं वेळापत्रक जाहीर केल्याने 2022 चे वेळापत्रक कधी जाहीर करणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी आयोगाला केला आहे.


MPSC RESULT 2019: अखेर MPSC परीक्षेचा निकाल जाहीर ; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला


कधी होणार राज्य सेवा परीक्षा?

आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

पदांचा तपशील :

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आली आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. एमपीएससीने या सदंर्भात परिपत्रक जारी केले आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPDC Updates : MPSC announces advertisement for state service examination 2021, Pre examination on Jan 2, 2022

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात