Goa Elections : उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता बेईमान आणि चारित्र्यवान यांच्यात होणार!

Goa Elections Sanjay Raut on Utpal Parrikar Independent Fighting - The battle in Panaji will now be between dishonesty and character

Goa Elections Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पणजीत आता लढाई बेईमान आणि चारित्र्यवान यांच्यात होणार आहे. कारण गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याच दिवशी उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. भाजपमधून पणजीतून तिकीट न मिळाल्याने ते नाराजे होते. Goa Elections Sanjay Raut on Utpal Parrikar Independent Fighting – The battle in Panaji will now be between dishonesty and character


वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पणजीत आता लढाई बेईमान आणि चारित्र्यवान यांच्यात होणार आहे. कारण गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याच दिवशी उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. भाजपमधून पणजीतून तिकीट न मिळाल्याने ते नाराजे होते.

पणजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात यांनी शुक्रवारी सांगितले की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी प्रयत्न केले. यावेळी मोन्सेरात म्हणाले की, पक्षाने त्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ते म्हणाले की, ‘मला खात्री आहे की त्यांचे वडील मनोहर पर्रीकर हयात असते तर ही गोष्ट कधीच घडली नसती.

पणजी विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यामध्ये पक्षाने उत्पल यांना तिकीट दिले नव्हते. दरम्यान, उत्पल हे पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी करत होते. मात्र, भाजपने उत्पल पर्रीकर यांना इतर दोन जागांपैकी निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय नेते उत्पल यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते.

संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते आणि म्हटले होते की, गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काँग्रेसने त्यात फारसा रस दाखवला नाही. संजय राऊत म्हणाले की, गोव्यात काँग्रेस एकट्याने सरकार स्थापन करेल असे वाटते. महाविकास आघाडी पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न काँग्रेसने हाणून पाडल्याचे ते म्हणाले. काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत माझी बातचीत झाली होती परंतु गोव्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे समजत नाही परंतु ते आमचं ऐकत नाहीत एवढा कॉन्फिडन्स त्यांना कोठून येत आहे.

राऊतांचा भाजपला टोला

राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने जी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्या सगळ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेने जवळ आहे. लक्ष्मीकांत पार्सेकरसारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यामध्ये भाजपाची बीजे रोवली हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते आज तेही म्हणत आहेत की भारतीय जनता पार्टी ला मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून माझी उमेदवारी नाकारली तर हे दुर्दैवी आहे. आशिष शेलार यांना मी नेहमीच चहा पाजत असतो. डिपॉझिट गेलं म्हणून निवडणुका लढायच्या नाहीत, असं निवडणूक आयोगाने कुठे सांगितलं आहे. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट, माफिया, धनदांडगे यांना जर उमेदवारी दिली असती तर आम्ही जिंकून आलो असतो.

Goa Elections Sanjay Raut on Utpal Parrikar Independent Fighting – The battle in Panaji will now be between dishonesty and character

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात