गिरीश महाजनांच सिनेनिर्मात्याकडे साकडं ; म्हणाले – अजितदादा, जयंत पाटील अन् मला सिनेमात घ्या


जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेGirish Mahajan to the filmmaker; Said – Ajitdada, Jayant Patil and take me to the cinema


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजितदादा, मुनगट्टीवार, जयंत पाटील, विखे पाटील आणि माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला सिनेमात भूमिका दया अशी मागणी भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी एका सिनेमा निर्मत्याकडे केली. जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गिरीश महाजन म्हणाले यांनी सिनेमा निर्मात्यांकडे ही मागणी केली आहे.

गिरीश महाजन यांनी म्हटलं, बाबुराव घोंगडे यांना एक विनंती आहे, आमच्या सहा टर्म झाल्या आहेत. महाराष्ट्रात आम्ही दोन-चार, पाच आमदार सिनिअर आहोत. जयंत पाटील, अजितदादा, सुधिर मुनगंटीवार, विखे पाटील आणि माझ्या सहा टर्म झाल्या आहेत. मी सिनिअर वाटत नाही पण आहे. सहावी टर्म आहे माझी. पण पक्षाचं काही धोरण आहे की, एका व्यक्तीला किती वेळा तिकीट द्यायचं. त्यामुळे पुढे-मागे आमची रिटायरमेंट होणार. त्यामुळे तुमच्या सिनेमात आम्हाला एखादी जागा ठेवा. पुढे आम्ही करणार काय? भविष्यात तुमच्या सिनेमात आम्हाला एखादी भूमिका द्या.

यावर सिनेमा निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासा ठी इंग्रजी सिनेमा काढून त्यात काम करण्याची संधी देईन. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

गिरीश महाजन हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटमोचकाचं काम केल्याचं पहायला मिळालं. इतकंच नाही तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्यांनी भाजपच्या गळाला लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गिरीश महाजन यांची ‘पिस्तुलगिरी’

फडणवीस सरकारमध्ये जलसंपदामंत्री असताना गिरीश महाजन यांची पिस्तुलगिरी पहायला मिळाली होती. ते चक्क पिस्तुल घेऊन नरभक्षक बिबट्याच्या शिकारीला निघाल्याचं दिसून आलं होतं. जळगावातल्या वरखेडे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या शोधमोहिमेत त्यांनी त्यांचं स्वतःचं पिस्तूल वापरल्याचा प्रकार समोर आला होता. पिस्तूल हे स्वसंरक्षणासाठी असताना बिबट्याला मारण्यासाठी गिरीश महाजन ते कसं काय वापरू शकतात? असा सवालही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

Girish Mahajan to the filmmaker; Said – Ajitdada, Jayant Patil and take me to the cinema

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात