मोबाईल खरेदीसाठी उधार दिलेले चार हजार रुपये न दिल्याने मित्राचा मित्राकडून खून करण्यात आल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे.मित्राचा खून करुन वाचण्यासाठी आरोपीने बनाव केल्याची बाब ही निष्पन्न झाली आहे. Friend gives four thousand rupees to lend other friend but he not return the money that reason youth murder in shivajinagar area
विशेष, प्रतिनिधी
पुणे -दारु पिल्यानंतर उसणे घेतलेल्या पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनाच्या समोरील डेंगळे ब्रीजजवळ घडली होती. त्यानंतर आरोपीने पोलिसांना संशय येऊ नये म्हणून मृताच्या पत्नीच्या घरी धिंगाणा घातला तसेच पोलीस चौकीत जाऊन मित्राने उधार घेतलेले पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रारही केली. मात्र त्याचा हा बणाव जास्त काळ चालला नाही.
त्यानंतर बारा तासात सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी खूनाचा छडा लावत आरोपीला अटक केली. बबलू उर्फ अबदुल्ला सरदार (वय.35,रा. बुधवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सद्दाम उर्फ ईस्माईल शेख (वय.25,रा. बुधवार पेठ) याचा खून झाला आहे. सरदार याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम व बबलू हे एकमेकांच्या ओळखीचे असून, मित्र आहेत. दोघेही मुळचे पश्चिम बंगाल येथील असून, बुधवार पेठेत राहतात. मयत सद्दाम बिगारी काम करतो तर आरोपी बबलू हा एका पानटपरीवर कामाला आहे. दोन दिवसापुर्वी सद्दाम याने बबलू याच्याकडून मोबाईल घेण्यासाठी हातउसणे पैसे घेतले होते. मात्र त्याला सद्दाम हा बुधवार पेठेतील एका वेश्येसोबत दिसला. यामुळे आपण मोबाईलसाठी दिलेल्या पैशावर सद्दम हा मौजमजा करत असल्याचा बबलूला राग आला सोमवारी सायंकाळी बबलूने त्याच्याकडे पैशाची मागणी केली. तेथून दोघे दारू पिण्यासाठी ढेंगळे पुलाखाली आहे. तेथे त्यांच्यात पैशावरून वाद झाला. त्यावेळी बबलूने सद्दामच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर बबलू तेथून पळून गेला होता
दरम्यान सद्दामचा मृतदेह डेंगळे पुलावर असल्याची माहिती सकाळी पोलिसांना मिळाली. पोलिसांना घटनास्थळी सद्दामचा मोबाईल मिळाला त्यावरील आलेले नंबर तपासले असता एक नंबर बबलूचा होता. पोलिसांनी तो फोन उचलल्यावर बबलूने माझे पैसे कधी देणार अशी विचारणा केली. यावर पोलिसांनी त्याच्या परिचयाचे व्यक्ती बोलत असून सद्दम जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. यानंतर बबलूचे लोकेशन काढले असता, ते बुधवार पेठेत मिळाले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपण सद्दामबरोबर दारु पिल्यावर तो कोठे गेला हे माहित नसल्याचे सांगित हात झटकले.
पोलिसांनी एका बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोघेही दारु पिऊन बाहेर पडताना दिसत होते. यावेळी बबलूच्या अंगावर पिंक कलरचा शर्ट होता. बबलूला ताब्यात घेऊन त्याला घटनेच्या दिवशी कोणता शर्ट घातला हे दाखवण्यास सांगितले. मात्र त्याने काळ्या-पिवळ्या रंगाचा शर्ट पोलिसांना दाखवला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवताच त्याला घाम फुटला. त्याने आपणच सद्दामचा खून केला. यानंतर रक्ताने माखलेला आपला शर्ट नदी पात्रात टाकल्याचे सांगितले. तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर यांच्या पथकाने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App