विशेष प्रतिनिधी
मुंबई : खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर फरार झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यां च्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाला या आशयाचा प्रस्ताव पाठवल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Former Mumbai Police Commissioner Parambir Singh to be suspended, proposal from DG Office to Home Ministry
पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीरसिंह आणि इतर पोलिस अधिकाºयांच्या निलंबनासाठी सप्टेंबरमध्ये गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका स्पष्ट करणारी विशिष्ट माहिती देण्यात यावी, असे गृहमंत्रालयाने सांगितले. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाने या आठवड्यात नवा प्रस्ताव पाठवला आहे.
खंडणी प्रकरणात नाव आलेल्या परमबीरसिंह आणि पोलिस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा विचार गृह विभाग करीत आहे, पण इतरांबाबत हा विचार नाही. स्थावर मालमत्ता विकसक श्यामसुंदर अगह्यवाल यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने परमबीरसिंह यांच्याविरोधात बुधवारी अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे.
सिंह यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले हे तिसरे अजामीनपात्र अटक वॉरंट आहे. यापूर्वी गोरेगाव आणि ठाणे येथे खंडणी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातही सिंह यांना अजामिनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालिन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला मुंबईतील बारवाल्यांकडून ही रक्कम गोळा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई करून अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App