गृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर,तारीख आणि वेळेसहित संवाद उघड

  • परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद उघड केला आहे .
  • तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाचा हा संवाद जसाच्या तसा.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत थेट लेटर बॉंब टाकला आहे. Parambir Singh made corruption and ransom allegations on Anil Deshmukh read all the conversation bitween Parambbir Singh and ACP Patil



अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा यात करण्यात आला आहे . या लेटर बॉंब मध्ये परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद देखील टाकला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हा संवाद जसाच्या तसा..

परमबीर सिंग – पाटील, गृहमंत्रीपलांडेंनी किती बार व रेस्तराँचे व किती रुपयांचे टार्गेट दिल्याचे सांगितले ?

  • परमबीर सिंग – अर्जंट प्लीज
  • ACP पाटील– 1750 बार व रेस्तराँ. प्रत्येकी 3 लाख रुपये. एकूण कलेक्शन अंदाजे 50 कोटी रुपये. पलांडेनी माझ्यासोबत भुजबळ होते तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली.
  • परमबीर सिंग– तुम्ही पलांडेंना कधी भेटलात ?
  • ACP पाटील– आम्ही 4 मार्चला भेटलो
  • परमबीर सिंग – तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटलात ?
  • ACP पाटील– पलांडेंना भेटलो त्याच्या 4 दिवस आधी. हुक्का पार्लरसंबंधी बैठक झाली.
  • परमबीर सिंग – वाझे व गृहमंत्र्यांची भेट कधी झाली ?
  • ACP पाटील– वाझे-गृहमंत्र्यांच्या भेट कधी झाले ते आता आठवत नाही.
  • परमबीर सिंग – तुम्ही म्हणाला होतात की काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.
  • ACP पाटील– हो सर. बहुधा फेब्रुवारीच्या अखेरीस.
  • परमबीर सिंग – पाटील मला आणखी काही माहिती हवीय. गृहमंत्र्यांना भेटून आल्यानंतर वाझे तुम्हाला भेटला होता का ?
  • ACP पाटील– हो सर. वझे मला भेटला होता.
  • परमबीर सिंग – गृहमंत्र्यांनी काय सांगितले आहे ते वाझेंना तुम्हाला सांगितले का ?
  • ACP पाटील– गृहमंत्र्यांनी 1750 बार-रेस्तराँकडून प्रत्येकी 3 लाख रुपये व एकूण 40-50 कोटींच्या वसुलीचे लक्ष्य दिलेय असे वाझेने सांगितले.
  • परमबीर सिंग – अच्छा..म्हणजे वाझेने मला सांगितले तेच तुम्हालाही सांगितलेय.
  • ACP पाटील– 4 मार्चला पलांडे यांनी मलासुद्धा वाझेला हेच टार्गेट दिलेय ते सांगितले.

Parambir Singh made corruption and ransom allegations on Anil Deshmukh read all the conversation bitween Parambbir Singh and ACP Patil

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*